

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर-पश्चिम काँगोमध्ये मुसळधार पावसामुळे रविवारी (दि.१८) भूस्खलन होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली असून काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे. बचाव पथक शोध मोहीम राबवत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंगला प्रांतातील लिस्ले शहरात काँगो नदीच्या काठावर ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि संपूर्ण प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
हेही वाचा :