पिंपरी : महापालिकेच्या 8 केंद्रांवर इन्कोव्हॅकचे लसीकरण | पुढारी

पिंपरी : महापालिकेच्या 8 केंद्रांवर इन्कोव्हॅकचे लसीकरण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 8 लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक इन्कोव्हॅक लसीचा प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्कर यांना हे लसीकरण केले जाईल. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोसनंतर सहा महिन्यांचा किंवा 26 आठवड्यांचा कालावधी त्यासाठी पूर्ण होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

केंद्रांवर येणार्‍या नागरिकांची कोविड अ‍ॅपवर नोंदणी करून नाकावाटे त्यांना हे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर त्यासाठी प्रत्येकी 20 लस पुरविण्यात येणार आहे. सकाळी 9ः30 ते दुपारी 4ः30 या वेळेत हे लसीकरण होईल. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर या कालावधीसाठी हा लसीकरण कार्यक्रम निश्चित केलेला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर 19, 22 आणि 28 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी असल्यामुळे त्या दिवशी हे केंद्र बंद राहतील. त्याशिवाय, दर रविवारी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुटी करण्यासाठी केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा

Nashik ZP : आज, उद्या जिल्हा परिषद राहणार सुरू; दोन दिवस विशेष मोहीम

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प.महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अभिजीत पवार यांची निवड

पुण्यात हिर्‍या-मोत्यांची पखरण अन् वस्त्रालंकार; रंगबिरंगी रत्नांनी सजल्या गणेशमूर्ती

Back to top button