स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प.महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अभिजीत पवार यांची निवड | पुढारी

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प.महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अभिजीत पवार यांची निवड

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिरोळ गटाचे तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजीत भूपालराव पवार यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी निवडीचे पत्र दिले.

“मराठा आरक्षणाबरोबरच समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना खासगी नोकरी उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार होतकरू विद्यार्थी, तरुण- तरुणींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांचे संघटन करून महासंघाचे विचार आणि कार्य घराघरात पोहोचवत संघटनेच्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न राहील,” असे अभिजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button