नाशिक क्राईम : हेमंत पारख यांच्या अपहरणाचे गूढ उलगडले, अपहरणकर्त्यांना अटक | पुढारी

नाशिक क्राईम : हेमंत पारख यांच्या अपहरणाचे गूढ उलगडले, अपहरणकर्त्यांना अटक

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाचे गुढ अखेर उलगडले असून नाशिक पोलिसांनी याप्रकरणी चार अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण? याचाही छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पारख यांचे शनिवारी (दि. २) रात्री त्यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणाच्या आठ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी पारख यांना बलसाड येथे सोडून पळून गेले होते. अद्याप पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडलेले नव्हते. अखेर खंडणीसाठी हेमंत पारख यांचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या परराज्यातील सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी महेन्द्र उर्फ नारायणराम बाबूराम बिष्णोई (३०) रा. मोर्या, तहसिल लोहावत, जिल्हा जोधपुर राजस्थान, पिंटू उर्फ देविसींग बद्रीसिंग राजपूत (२९) रा. राजेंद्रनगर, जिल्हा पाली राजस्थान,  रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई (२०) रा. गावं फुलसरा छोटा, तहसिल बजू, जिल्हा बिकानेर, राजस्थान यांना अटक केली आहे. तसेच या अपहरण प्रकरणातील मास्टर माईन्ड हा नाशिक शहरातीलच असून अनिल भोरु खराटे (२५) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच खंडणीसाठी मागितलेल्या रकमेसह एकुण १ कोटी ४१ लाख ३२ हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणातील आणखी तिघांचा शोध पोलिस घेत आहे.

हेही वाचा :

Back to top button