Weather Update | राज्यातील ‘या’ भागांत १५ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस, IMD ची माहिती | पुढारी

Weather Update | राज्यातील 'या' भागांत १५ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस, IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन : कोकण, पूर्व महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तास पाऊस कायम राहणार आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातही पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज १३ सप्टेंबर रोजी उत्तराखंड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Weather Update)

उत्तराखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये १४ सप्टेंबरलाही अशीच हवामानाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबर रोजी उत्तराखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ओडिशातील ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पहाटे ओडिशातील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये १३-१४ सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार आणि १५ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मलकानगिरी, कोरापूट, नबरंगपूर, कालाहंडी, बोलंगीर आणि कंधमाल या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला असल्याची माहिती भुवनेश्वर येथील हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमा शंकर दास यांनी दिली आहे. (Weather Update)

ते पुढे म्हणाले की ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी किंवा २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. “उत्तर-पश्चिम लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाले आहे. याच प्रदेशात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या प्रभावामुळे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.”

हे ही वाचा :

Back to top button