पैठण-मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराज मंडळीच्यावतीने भजन | पुढारी

पैठण-मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराज मंडळीच्यावतीने भजन

पैठण – पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांनीदेखील आपला सहभाग घेऊन बुधवारी दि.१३ रोजी सकाळी एक दिवसीय लाक्षणिक भजन सुरू करून मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गेल्या सात दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषण आंदोलनात दररोज वेगवेगळ्या गावातील मराठा बांधव व महिला मंडळ सहभाग घेत आहेत. बुधवारी रोजी सकाळी पैठण पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळीने भजन गायले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या साखळी उपोषणात सहभाग घेऊन मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा देऊन एक दिवस भजन कार्यक्रम सुरू केला आहे.

यावेळी पंचक्रोशीतील ह.भ‌.प भाऊसाहेब महाराज आंबाडे, विष्णुकांत महाराज शास्त्री, गणेश महाराज तावरे, शिवाजी महाराज चौधरी,रायभान महाराज डीके, अविनाश महाराज भुसारे, श्याम महाराज नरवडे, माणिक महाराज ढवळे, बाबासाहेब महाराज गिरगे, गोरखनाथ महाराज गुळे, सोमनाथ महाराज कराळे, संतोष महाराज गारूळे, दीपक महाराज उगले, दत्ताजी महाराज खिडकर, परमेश्वर महाराज शिंदे, बद्रीनाथ महाराज नवल यांच्यासह वारकरी संप्रदायातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

Back to top button