‘सपा’ नेते आझम खान यांच्‍या निवासस्‍थानी आयकर विभागाचा छापा, ‘जौहर ट्रस्‍ट’प्रकरणी कारवाई | पुढारी

'सपा' नेते आझम खान यांच्‍या निवासस्‍थानी आयकर विभागाचा छापा, 'जौहर ट्रस्‍ट'प्रकरणी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी मंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते आझम खान (Azam Khan) यांच्या घरावर आज (दि.१३) सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. आझम खान यांच्‍या अल जौहर ट्रस्टमध्ये ( Al Jauhar Trust) झालेल्या आर्थिक गैरव्‍यवहारप्रकरणी रामपूर, मेरठ, गाझियाबाद, सहारनपूर, सीतापूर आणि लखनऊमध्ये ही कारवाई करण्‍यात आली आहे.

सहा महिन्यांपूर्वी आयकर विभागाने माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या आयकर प्रतिज्ञापत्रांची पुनर्तपासणी सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांनी दाखल केलेल्या आयकर प्रतिज्ञापत्रात अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. त्याचवेळी तपासादरम्यान आझम खान यांच्‍या पत्‍नी तंजीन फातिमाच्या बँक खात्यांमध्ये अनेक आर्थिक गैरव्‍यवहार उघडकीस आले असून, या खात्यांमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार आढळून आले हाेते.

जोहर ट्रस्टमधील अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहारही आढळून आले आहेत. आयकर विभाग आणि ईडी जवळपास तीन वर्षांपासून आझम खान, त्यांचे कुटुंबीय आणि जौहर ट्रस्टची कसून चौकशी करत आहेत.


हेही वाचा :

Back to top button