Jawan Pune Connection : काय सांगता? जवानचा ‘तो’ सिन पुण्यातला; तुमचा विश्वासच बसणार नाय? | पुढारी

Jawan Pune Connection : काय सांगता? जवानचा 'तो' सिन पुण्यातला; तुमचा विश्वासच बसणार नाय?

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान अर्थातच शाहरुख खानचा जवान हा सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. बहुचर्चित असलेला हा जवान चित्रपट ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या जवान चित्रपटाचं आपल्या पुण्याशी खास कनेक्शन आहे. या सिनेमातलं काही सीनच शूटिंग पुण्यात झालं असल्याची माहिती पुणे महामेट्रोनं एक्सवर एक खास पोस्ट करत दिली आहे.

यापूर्वी याच वर्षी जानेवारीमध्ये किंग खानचा पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटानं जवळपास हजार कोटींची कमाई केली होती. त्याप्रमाणेच जवाननं देखील पहिल्याच दिवशी भारतातून कोटींची कमाई केल्याचे आकडे समोर आले होते. जवान सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच मनात उतरल्याचं चित्र आपणाला पहिला मिळत आहे. सर्वच चित्रपटगृहांतील शो हाउसफूल होत असताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथीबरोबर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही झळकली आहे.

पुण्यातील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकात आणि मेट्रो ट्रेनमध्ये जवान चित्रपटाचे काही सीनचे शूटिंग झाले आहे. दरम्यान चित्रपटामधील तो मेट्रोचा खास सीन शुट झाल्याचे गिरीजाने सांगितलं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेट्रोमधील तो खास सीन दाखविण्यात आला आहे. शाहरुख खान आणि काही महिला मेट्रो हायजॅक करताना दिसत आहेत. हे शूटिंग मेट्रो स्टेशनवर करण्यात आलं आहे. असे अभिनेत्री गिरीजा ओकने एका मुलाखतीत जवान चित्रपटाच्या पुण्यातील शूटिंगबद्दल भाष्य केलं आहे.

मेट्रोनं अधिकृत एक्स या सोशल मीडियावरुन दिली माहिती

त्यांनी असे म्हटले आहे की, जवान चित्रपटाचं शुटींग हे २०२१ मध्येच झाले आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चित्रीकरणासाठी पुणे मेट्रोची निवड होणं हे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी खरचं अभिमानाची बाब होती. पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो प्रोजेक्टमधील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये जवानच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा

मुलांचा उद्धटपणा वाढलाय?,पालकांनी नेमकं काय करावे? जाणून घ्‍या सविस्‍तर

रत्‍नागिरी : परटवणेत ट्रकची दुचाकीला धडक; एक जण ठार

पुण्यात दोन दादांच्या कुरघोडी : सकाळी लवकर उठायला शिका, नेमका सल्ला कुणासाठी?

Back to top button