रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी शहरातील परटवणे येथे मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ट्रकचे चाक दुचाकी चालकाच्या अंगावरून गेले. हा युवक साखरतर येथील असल्याचे समजत असून, तो रत्नागिरीहून साखरतरला जात असताना, समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली.
या अपघातामुळे साखरतर येथील नागरिक आक्रमक झाले. त्वरित कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात स्थळावर वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
हेही वाचा :