भंडारदर्‍यातून सोडलेल्या पाण्याची चोरी | पुढारी

भंडारदर्‍यातून सोडलेल्या पाण्याची चोरी

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भंडारदरातून सध्या 1550 क्युसेसने पाणी सोडले जात आहे. यापैकी श्रीरामपूरपर्यंंत फक्त 361क्युसेस पाणी पोहचत आहे. याचा अर्थ श्रीरामपूरच्या वाट्याला केवळ तीस टक्केच पाणी येत आहे. असे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. सदर आकडेवारीनुसार भंडारदर्‍यातून 1550 क्युसेस विसर्ग होत आहे. यापैकी कळस येथे 1380 तर ओझर बंधारा येथे 1232 क्युसेस इतका विसर्ग मिळत आहे. यातून डावा कालवा 931 क्युसेस तर उजवा कालवा 301 क्युसेस पाणी सोडले आहे.

डावा कालव्यातून सोडलेल्या 931 क्युसेसपैकी बाभळेश्वर हेडला 631 क्युसेस इतका विसर्ग मिळत आहे. यापैकी श्रीरामपूरला बेलापूर 261क्युसेस तर एन. बी. उपकालवा 100 क्युसेस असे एकुण 361क्युसेस पाणी मिळत आहे. याचा अर्थ ओझर येथून उपलब्ध 931 क्युसेसपैकी ओझर ते बाभळेश्वर दरम्यान 300 क्युसेस तर बाभळेश्वर ते बेलापूर दरम्यान 276 क्युसेस पाणी वापर होत आहे. असा एकुण 576 क्युसेस पाणि वापर वरच्या भागात होत असून, श्रीरामपूरच्या वाट्याला 361 क्युसेस म्हणजे केवळ तीस टक्के पाणी मिळत आहे.

धरणातील पाणीसाठा व विसर्ग

सध्या भंडारदरा धरणात 10870 दलघफू. पाणीसाठा उपलब्ध आहे तर विसर्ग 820 क्ुयसेस आहे. निळवंडे -(साठा 7125, विसर्ग1550), कळस- (1380), ओझर- (81.90), नदी विसर्ग-उजवा कालवा-301डावा कालवा-931, बाभळेश्वर-637, एन. बी-100, बेलापूर-261 असा आहे.

हेही वाचा

कुरकुंभ : जिरेगाव तलावाने गाठला तळ ; पाणीटंचाईचे संकट

परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात: कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे पोहोचले रुग्णालयात

पुण्यातील शाळांच्या प्रवेशद्वारांवर व्यसनांचे ‘धडे’! विद्यार्थी धूम्रपानाच्या आहारी

Back to top button