परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात: कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे पोहोचले रुग्णालयात

परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात: कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे पोहोचले रुग्णालयात
Published on
Updated on


परळी वैजनाथ, कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या संवेदनशीलतेची आणि आपल्या सहकाऱ्यांबाबतची आत्मीयता अनेक वेळा दिसून आलेली आहे. याची प्रचिती आज (दि.६) पुन्हा एकदा दिसून आली. परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात झाला. धनंजय मुंडेंना याबाबत कळताच कॅबिनेट बैठक व आपल्या हातची सर्व महत्त्वाची कामे सोडून मंत्री मुंडे त्यांच्या मदतीला धावून गेले.

परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह अन्य तीन जण आज मुंबईकडे जात होते. डिव्हायडरला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात दीपक देशमुख यांच्यासह तीन जण जखमी झाले.  हा अपघात झाल्याचे मंत्री मुंडे यांना कळताच आपल्या सर्व नियोजित बैठका सोडून त्याचबरोबर कॅबिनेटची बैठक सोडून तातडीने ते रुग्णालयात दाखल झाले. अपघातग्रस्तांना सुरुवातीला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मंत्री मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, कार्यालयीन कर्मचारी राणे, हाके आदींनी या अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित केली. तर मंत्री मुंडे यांनी उपचाराची सर्व ती व्यवस्था स्वतः जातीने लक्ष देऊन केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सर्वांना धीर देताना ते दिसले. आता जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news