Google Dark Web Report | माफियांच्या इंटरनेटवर तुमची ओळख विकली जातेय? गुगल देणार अलर्ट | पुढारी

Google Dark Web Report | माफियांच्या इंटरनेटवर तुमची ओळख विकली जातेय? गुगल देणार अलर्ट

Google Dark Web Report | गुगलच्या पेड मेंबर्ससाठी नवी सुविधा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनेटची एक काळी बाजूही आहे. जगभरातील माफिया, ड्रग्ज डिलर, हत्यारे विकणारे, हॅकर्स अशा गुन्हेगारांचं नेटवर्क इंटरनेटवर आहे, याला डार्क वेब या नावाने ओळखले जाते. या डार्क वेबवर तुमच्या माहितीचाही गैरवापर होऊ शकतो. आता गुगलने तुमची माहिती, तुमच्या संदर्भातील डेटा डार्क वेबवर वापरला गेला आहे का, हे पाहाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुगल वनचे भारतातील सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Google Dark Web Report)

गुगल वन ही गुगली सशुल्क सुविधा आहे. यावर आता Dark Web Reportच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या डार्क वेबमधील माहितीवर लक्ष ठेऊ शकतात. लाईव्ह मिंट या वेबसाईटने ही माहिती दिली आहे.

इमेल आयडी, जन्मतारीख, मोबाईल नंबर, इमेल आणि इतर वैयक्तिक माहितीचा वापर करून ओळख चोरणे (identity theft), आर्थिक गुन्हे अशी कृत्ये हे गुन्हेगार करू शकतात; पण गुगलच्या The Google Dark Web Report फिचरमुळे युजरची माहिती जर डार्क वेबमध्ये लिक झाली असेल तर युजरला अलर्ट जाईल. आपला डेटा कसा सुरक्षित ठेवायचा याची माहितीही गुगल तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. गुगलची सशुल्क सेवा ज्यांनी घेतलेली नाही, अशांना फक्त एकवेळ डार्क वेबवर आपली कोणती माहिती आहे का हे चेक करता येणार आहे; पण त्यांना ऑनगोईंग मॉनिटरिंगचा लाभ घेता येणार नाही.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगल वनचे जे सदस्य आहेत, त्यांना डार्क वेबवर त्यांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि इमेल डार्क वेबवर लिक झाला आहे का हे पाहाता येईल. जास्तीजास्त दहा इमेल अशा प्रकारे चेक करता येतील. याशिवाय आपली कोणती माहिती डेटा ब्रीच किंवा हॅकिंगसाठी वापरली जाऊ शकते, याचीही माहिती गुगल देणार आहे.

हेही वाचा

 

Back to top button