अफगाणिस्तानच्या आरिफ संगरने २९ चेंडूंत ठोकले शतक | पुढारी

अफगाणिस्तानच्या आरिफ संगरने २९ चेंडूंत ठोकले शतक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फलंदाज आरिफ संगरने आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. आरिफने युरोपियन क्रिकेट मालिकेतील टी-10 सामन्यात केवळ 29 चेंडूंत धडाकेबाज शतक झळकावले. आरिफने 35 चेंडूंत 118 धावांच्या खेळीत एकूण 2 चौकार आणि 17 षटकार ठोकले.

ईसीएस स्वित्झर्लंड टी-10 लीग सामन्यात पॉवर सीसी विरुद्ध पख्तून जल्मीकडून खेळत असलेल्या आरिफ संगरने 337.14 च्या स्ट्राईक रेटने खेळ केला. आरिफने केवळ 29 चेंडूंत शतक झळकावून नवा इतिहास रचला. आरिफने एका षटकात 29 धावा चोपल्या. आरिफने 97 धावांवर खेळत षटकार ठोकून शतक पूर्ण केले. आरिफच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पख्तून जल्मीने 10 षटकांत 3 बाद 185 धावा उभ्या केल्या आणि प्रत्युत्तरात पॉवर सीसीचा संघ 103 धावांत तंबूत परतला.

टी-20 मध्ये गेलच्या नावावरील विक्रम अजूनही अबाधित

टी-20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या 30 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

Back to top button