Bengaluru Fire | बंगळूर महानगरपालिका इमारतीत आग, ८ कर्मचारी जखमी
बंगळूर : पुढारी ऑनलाईन, बंगळूर महानगरपालिकेच्या इमारतीत (BBMP) आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत महानगरपालिकेतील ८ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bengaluru Fire)
Karnataka | Fire breaks out in the premises of BBMP (Bruhat Bengaluru Mahanagara Palike) office in Bengaluru. More details are awaited.
— ANI (@ANI) August 11, 2023
क्वॉलिटी कंट्रोल लॅबमध्ये ही आग लागली. तेथे काम करणारे जवळपास सर्व कर्मचारी जखमी झाले आहेत. या आगीच्या घटनेनंतर बीबीएमपीचे आयुक्त तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एक मुख्य अभियंताही जखमी झाला आहे.
अग्निशमन दलाला ४.५२ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी दोन गाड्या दाखल झाल्या.
हे ही वाचा :