म्यानमारमध्ये बोट बुडून २३ रोहिंग्या मुस्लिमांचा मृत्यू, ३० बेपत्ता : मलेशियाकडे पलायन करताना दुर्घटना | पुढारी

म्यानमारमध्ये बोट बुडून २३ रोहिंग्या मुस्लिमांचा मृत्यू, ३० बेपत्ता : मलेशियाकडे पलायन करताना दुर्घटना

Rohingya Refugees Die : मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारमधील राखिने राज्यातून मलेशियाकडे निघालेली बोटू समुद्रात बुडाल्याने २३ रोहिंग्या मुस्लिमांचा मृत्यू झाला आहे, तर ३० लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर या दुर्घटनेत ८ जण बचावले आहेत. रोहिंग्या राज्याची राजधानी सिटवे येथे ही घटना घडली. म्यानमारमधून मलेशियाकडे बेकायदेशीररीत्या नेणाऱ्या तस्करांची ही बोट होती. ही बोट बुडाल्यानंतर या तस्करांनी पलायन केले आहे. अशा प्रकारे मलेशियात नेण्यासाठी एका माणसाकडून हे तस्कर चार हजार डॉलर इतके पैसे घेतात.

राखिने येथील हिंसाचारानंतर तेथील अनेक विस्थापित मुस्लिमांना बंगलादेशात आसरा घेतला आहे. आता जे राखिनेमध्ये राहातात, तेही अन्यत्र जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बचाव पथकातील ब्यार ला यांनी बोटवर ५० लोक होते अशी महिती दिली आहे. “रविवारी उशिरा रात्री ही बोट मलेशियाकडे निघाली होती. पण समुद्रातील हवामान बिघडल्याने ही बोट बुडाली.” गुरुवारपर्यंत २३ मृतदेह मिळाल्याचे बीबीसीच्या बातमीत म्हटले आहे. यात १३ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button