Fifth Force | निसर्गातील पाचव्या शक्तीचा शोध; आईन्सटाईन यांच्या सापेक्षतावादा नंतरचा सर्वांत मोठा शोध? | पुढारी

Fifth Force | निसर्गातील पाचव्या शक्तीचा शोध; आईन्सटाईन यांच्या सापेक्षतावादा नंतरचा सर्वांत मोठा शोध?

पदार्थ विज्ञानानातील क्रांतिकारी शोध | Fifth Force

पुढारी ऑनलाईन डेस्क : पदार्थ विज्ञानशास्त्राला कैक पटीने पुढे नेणारा शोध अमेरिकेतील संशोधकांना लावला आहे. निसर्गातील पाचव्या शक्तीचा शोध लावल्याचा दावा या संशोधनकांनी केला आहे. निसर्गात आताच्या घडीला गुरुत्वाकर्षण, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, प्रबळ शक्ती आणि दुर्बल शक्ती हे चार शक्ती आहेत. पण या जोडीनेच निसर्गात पाचवी शक्तीही कार्यरत आहे, असे या संशोधकांनी म्हटले आहे.

शिकागो येथील Fermilab या प्रयोगशाळेतील संशोधकांनी हा दावा केला आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी अजून डेटा लागणार आहे, जर याची पुष्ठी करता आली तर पदार्थ विज्ञानशास्त्रातील ही क्रांती ठरेल असे संशोधकांनी म्हटले आहे. आईन्सटाईन यांच्या सापेक्षतावादा नंतरचा सर्वांत मोठा शोध ठरू शकणार आहे. या संदर्भातील बातमी बीबीसीने दिली आहे. (Fifth Force)

निसर्गातील पाचवी शक्ती कोणती? Fifth Force

प्रचलित विज्ञानानुसार संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या चार शक्ती आहेत. गुरुत्वाकर्षण, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, प्रबळ शक्ती आणि दुर्बल शक्ती. विश्वातील सर्व वस्तू आणि कण यांचे परस्पराशी असलेले संबंध या चार शक्तींवर अवलंबून असते. आता संशोधकांनी पाचवी शक्तीही असल्याचा दावा केला आहे.

पाचव्या शक्तीचा शोध कसा लागला? Fifth Force

Fermilab मध्ये G-2 (जी मायनस टू) हे संशोधन सुरू आहे. संशोधकांनी सबअॅटामिक पार्टिकल असलेल्या Muonsना एका ५० मीटर परिघाच्या रिंगमध्ये गती दिली आणि या पार्टिकलाना १००० वेळा प्रकाशाच्या गतीने फिरवण्यात आले. हे संशोधन सुरू असताना हे पार्टिकल अपेक्षितरीत्या वर्तन करत नाहीत, असे संशोधकांना दिसून आले. या पार्टिकल किंवा कणांचे वर्तन प्रचलित मॉडेलनुसार (Standard Model) नव्हते. याचाच अर्थ हे पार्टिकल किंवा कण अन्य कोणत्या तरी शक्तीच्या प्रभावाखाली होते. हा शक्तीला संशोधकांनी पाचवी शक्ती म्हटले आहे.

निसर्गातील पाचवी शक्ती Fifth Force

संशोधकांनी Muons या कणांना अतिशय प्रबळ अशा सुपरकंडक्टिंग चुंबकाच्या प्रभावात फिरवले होते. पण त्यांचा वेग हा अपेक्षेपेक्षा जास्त होता. स्टँडर्ड मॉडेलने दिलेल्या गतीपेक्षाही यांची गती जास्त होती. हे पाचव्या शक्तीच्या प्रभावाखील झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button