१९ अब्ज किमीवरील व्हॉयेजर २ पुन्हा संपर्कात; NASAच्या संशोधकांचे मोठे यश | पुढारी

१९ अब्ज किमीवरील व्हॉयेजर २ पुन्हा संपर्कात; NASAच्या संशोधकांचे मोठे यश

Voyager 2 | नासाची 'अंतराळ हाक' व्हॉएजरने ऐकली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विज्ञानातील काही गोष्टी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. नासाची व्हॉयेजर ही मोहीम यातीलच एक. व्हॉयेजर १ आणि व्हॉयेजर २ या दोन्ही मोहिमातील यान सूर्यमालेच्याही पलीकडे गेले आहेत. यातील व्हॉयेजर २चा संपर्क काही महिन्यांपूर्वी तुटला होता. जवळपास १९.९ अब्ज किलोमीटर किंवा १२ अब्ज मैल इतक्या अंतरावर असलेल्या या यानाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात नासाला काही दिवसांपूर्वी यश आलेले आहे.

Voyager 2 | नेमका संपर्क कसा तुटला?

व्हॉयेजर २ ही मोहीम १९७७ ला लाँच केले होती. हे याना सध्या सूर्यमालेच्या ही पलीकडे गेले आहे. पण २१ जुलैला नासाकडून एक चुकीचा संदेश पाठवला गेला. त्यामुळे झाले असे की या यानावरील अँटेना पृथ्वीपासून दोन डिग्रीने दूर गेला. या घटनेमुळे या यानातून पृथ्वीकडे पाठवले जाणारे सिग्नल आणि नासाच्या नियंत्रण कक्षातून यानाकडे पाठवाले जाणारे सिग्नल बंद झाले. आता ही परिस्थिती फक्त १५ ऑक्टोबरला सुरळीत होऊ शकणार होती, याचे कारण म्हणजे व्हॉयेजर २चे स्वयंचलित रिअलाईंनमेंट या दिवशी नियोजित होते.
पण संशोधकांनी अथक प्रयत्नातून हे यान पुन्हा पूर्वस्थितीत आणले आहे, आणि या यानाशी संपर्कही प्रस्थापित झाला आहे. काही

दिवसांपूर्वी यानातून अत्यंत कमी क्षमतेचे तरंग नोंदवता आले होते. याला हार्टबीट असे म्हटले जाते. पृथ्वीवरील Deep Space Network वर हे तरंग नोंदवले गेले. पण या तरंगाची क्षमता अत्यंत क्षीण अशी होती.

नासाची Jet Propulsion Laboratory हा मोहिमेचे संयोजन करते. या प्रयोगशाळेने यानाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचे सांगितले आहे. व्हॉयेजर प्रकल्पाच्या व्यवस्थापक सुझान यांनी ही माहिती दिली आहे. डीप स्पेस नेटवर्कच्या माध्यामातून या यानाला शक्तिशाली संदेश पाठवण्यात आला. या संदेशाला Interstellar Shout असे म्हटले गेले आहे. हा संदेश या यानापर्यंत पोहोचण्यासाठी १८.५ तास इतका वेळ लागला. प्रकाशाच्या वेगाने हा संदेश प्रवास करतो. ४ ऑगस्टला या यानाने पाठवलेला संदेश Jet Propulsion Laboratory नोंदवला गेला.

Voyager 2 माणसाचा दीपस्तंभ

सूर्यमालेच्या सूर्यामुळे निर्माण झालेला एक चुंबकीय बुडबुडा आहे, याला हेलिओस्पेअर असे म्हटले जाते. डिसेंबर २०१८ला व्हॉएजर २ने हेलिओस्पेअर ओलांडले. या यानाने ज्युपिटर, शनी, युरेनस, नेप्युचन यांचाही अभ्यास केला आहे. तर व्हॉएजर १ने २०१२लाच सूर्यमालेच्या बाहेर पाऊल टाकले होते. व्हॉएजर १ सूर्यमालेपासून १५ अब्ज मैल इतक्या अंतरावर आहे.

हेही वाचा

Back to top button