Nasa
Nasa

NASA : धुळीत दडलेल्या शेकडो कृष्णविवरांचा शोध

Published on

वॉशिंग्टन : वेगवेगळ्या आकाशगंगांच्या मध्यभागी तारे व धुळीमध्ये दडलेल्या 400 पेक्षाही अधिक कृष्णविवरांचा छडा लावण्यात आला आहे. (NASA) धुळीच्या जणू काही कोषातच असल्याने ही कृष्णविवरे आजपर्यंत अज्ञात राहिली होती. त्यापैकी बहुतांश कृष्णविवरांचा शोध 'नासा'च्या (NASA) चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीने लावला आहे.

ब्रह्मांडातील जवळजवळ प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रभागी एक 'सुपरमॅसिव्ह' म्हणजेच अतिशय शक्तिशाली असे कृष्णविवर आहेच. अशी कृष्णविवरे सूर्यापेक्षा लाखो पटीने अधिक मोठी व शक्तिशाली असतात. ही कृष्णविवरे वायू, धूळ आणि तारे गिळंकृत करीत असल्याने त्यांच्यामधून ऊर्जेची तेजस्वी किरणे निर्माण होत असतात.

त्याला 'अ‍ॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लेई' (एजीएन) असे म्हटले जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या एक्स-रे भागात हे 'एजीएन' अधिक तेजस्वी दिसत असते, असे हार्वर्ड अँड स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे खगोलशास्त्रज्ञ डोंग-वू किम यांनी सांगितले. त्यामुळे अशा कृष्णविवरांचा छडा लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news