Rainfall again: राज्यात ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुसळधार!
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा राज्याला ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा ऑरेंज अलर्ट (Rainfall again) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.
1 Aug: बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression).संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता
नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता
पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD pic.twitter.com/NNYa9YFtJK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2023
⚠️#OrangeAlert ⚠️ #Konkan & #Goa and #MadhyaMaharashtra Bracing for Heavy Rainfall from 1st to 3rd August. Stay prepared and stay safe during this period.#WeatherAlert #RainyDays #MonsoonSeason #StaySafeAndDry #WeatherUpdates@moesgoi@DDNewslive@ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/Amq2bELYfN
— India Meteorological Department (@Indiametdept) August 1, 2023
राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना ३ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज (Rainfall again) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बांग्लादेश किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते आज संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४ तासात Gangetic West Bengal ओलांडणार (Rainfall again) आहे, असे देखील के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.