Rainfall Activity : हिमाचलमध्ये पुन्हा अतिमुसळधारेचा इशारा | पुढारी

Rainfall Activity : हिमाचलमध्ये पुन्हा अतिमुसळधारेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या हालचाली पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे हिमाचलमध्ये पुन्हा एकदा अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या शिमला प्रादेशिक विभागाचे शास्त्रज्ञ संदीप कुमार (Rainfall Activity) यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या हालचाली पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे ३ आणि ४ ऑगस्टला हिमाचल प्रदेशातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील पावसाची स्थिती ७ ऑगस्टपर्यंत कायम (Rainfall Activity) राहणार आहे, असे देखील IMD चे शास्त्रज्ञ संदीप कुमार यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये २ ऑगस्ट, पश्चिम मध्य प्रदेशात 2 आणि 3 ऑगस्ट, पूर्व उत्तर प्रदेश 1 आणि 2 ऑगस्ट तर पश्चिम उत्तर प्रदेशात ३ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा (Rainfall Activity) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button