पुणे : कांदा, पालकचे भाव स्थिर ; बटाटा, पालेभाज्या, मिरचीची आवक वाढली | पुढारी

पुणे : कांदा, पालकचे भाव स्थिर ; बटाटा, पालेभाज्या, मिरचीची आवक वाढली

अविनाश दुधवडे

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, पालेभाज्या व हिरवी मिरचीची मोठी आवक झाली. लसणाची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले. मेथी, कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक झाली. पालकची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल व म्हैस यांच्या संख्येत घट होऊन त्यांचे भाव स्थिर राहिले. शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख रुपये झाली. कांद्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 250 क्विंटलने घटून कमाल भाव 1,600 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 250 क्विंटलने वाढून बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 12 हजार रुपयांवरून 14 हजार रुपयांवर पोहचला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 425 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 50 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,600 रुपये, भाव क्रमांक 2. 1,400 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.
बटाटा : एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,600 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेला भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 21 हजार 500 जुड्या (400 ते 800 रुपये), कोथिंबीर – एकूण 39 हजार जुड्या (100 ते 400 रुपये), शेपू – एकूण 3 हजार, 600 जुड्या (500 ते 800 रुपये), पालक – एकूण 4 हजार जुड्या (300 ते 600 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 35 जर्शी गायींपैकी 28 गायींची विक्री झाली. (20,000 ते 50,000 रुपये). 75 बैलांपैकी 42 बैलांची विक्री झाली (15,000 ते 30,000 रुपये), 120 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये). 5,230 शेळ्या-मेंढ्यांपैकी 4,875 शेळ्यांची विक्री झाली (2,000 ते 25,000 रुपये).

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 170 क्विंटल (7,000 ते 9,000 रुपये), कोबी – 195 क्विंटल (1,000 ते 1,400), फ्लॉवर – 235 क्विंटल (500 ते 1,500), वांगी – 83 क्विंटल (3,000 ते 4,000), भेंडी – 82 क्विंटल (2,000 ते 3,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 74 क्विंटल (2,500 ते 3,500), दुधीभोपळा – 64 क्विंटल (2,000 ते 3,000), काकडी – 80 क्विंटल (800 ते 1,200), फरशी – 40 क्विंटल (5,000 ते 7,000), वालवड – 63 क्विंटल (4,000 ते 6,000), गवार – 57 क्विंटल (5,000 ते 7,000), ढोबळी मिरची – 180 क्विंटल (4,000 ते 6,000), चवळी – 25 क्विंटल (3,000 ते 4,000), शेवगा – 30 क्विंटल (3,000 ते 4,000), गाजर – 150 क्विंटल (2,000 ते 2,500).

Back to top button