पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण 85 टक्के भरले | पुढारी

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण 85 टक्के भरले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर एकूण 1 हजार 777 मिलिमईटर पावसाची नोंद झाली असून, धरण 85.16 टक्के इतके भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी दिवसभरात काही काळ पावसाने उघडीप दिली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 45 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तर, दुपारी चार वाजेपर्यंत आणखी 9 मिलिमिटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजअखेर धरण क्षेत्रात एकूण 1 हजार 581 मिलिमिटर इतका पाऊस झाला होता. तर, धरण 81.47 टक्के इतके भरले होते. त्या तुलनेत धरणातील पाणी साठा यंदा गतीने वाढला आहे.

मुळशी धरण परिसरात रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 145 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 446.34 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे. त्यामुळे 78.20 टक्के इतके धरण भरले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु पुढील तीन ते चार दिवसांत धरणाच्या सांडव्यावरुन नियंत्रित विसर्ग मुळा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

लवंगी मिरची : ऐतिहासिक भेट

सांगली : बागणीसह तीन गावांत पंजे-सवारी भेटी

डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ

Back to top button