‘वेस्ट टू एनर्जी’चे पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन | पुढारी

‘वेस्ट टू एनर्जी’चे पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन

पिंपरी(पुणे) : बोर्‍हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजना गृहप्रकल्पांतील 1 हजार 288 सदनिकांचे लाभार्थ्यांना वितरण आणि डुडुळगाव येथील गृहप्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलिस परेड मैदान येथून ऑनलाईन माध्यमातून मंगळवारी (दि. 1) करण्यात येणार आहे. तसेच, मोशी कचरा डेपो येथील कचर्‍यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिंचवड येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पीएमआरडीचे आयुक्त उपस्थित राहणार आहेत.

प्रकल्पासाठी 127 कोटी, 70 लाख खर्च

आयुक्त सिंह यांनी सांगितले की, बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्यांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी 127 कोटी 70 लाख खर्च झाला आहे. डुडुळगाव येथे 1 हजार 190 सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 188 कोटी 18 लाख खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे.

मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 700 टन सुक्या कचर्‍यापासून प्रत्येक तासाला 14 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी 12 मेगावॅट वीज महापालिका 5 रुपये प्रती युनिट दराने घेणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात 40 टक्के बचत होणार आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्त्वावर अ‍ॅन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. मार्फत विकसित केला गेला आहे. तो 21 वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. यासाठी 300 कोटींचा खर्च झाला आहे. हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

हेही वाचा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाणे-खारेगाव मार्गाची पाहणी

शुभमन गिल वन-डे क्रिकेटमध्‍ये नंबर वन!, मोडला बाबर आझमचा विक्रम

सिंधुदुर्ग : पिंगुळीत पोलिस कर्मचाऱ्याच्या कारच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार!

Back to top button