ठाणे ; पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (रविवार) सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अनिल राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :