Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेत, पाहा सेन्सेक्स, निफ्टीची आजची स्थिती | पुढारी

Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेत, पाहा सेन्सेक्स, निफ्टीची आजची स्थिती

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी घसरून ६६ हजारांवर आला. तर निफ्टी १९,६०० वर होता. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर टीसीएस, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, टीसीएस, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर पॉवर ग्रिड, एम अँड एम, रिलायन्स, नेस्ले इंडिय हे शेअर्स वाढले आहेत.

दरम्यान, भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ कमी झाला आहे. NSE डेटानुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,९७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,५२८ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयानंतर येथील शेअर बाजारात घसरण दिसून आली. जपानची मध्यवर्ती बँक कडक धोरण राबवणार असल्याच्या शक्यतेने आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button