रत्नागिरी : तब्बल साडेतीन तासानंतर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ववत | पुढारी

रत्नागिरी : तब्बल साडेतीन तासानंतर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ववत

लांजा; पुढारी वृत्तसेवा : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी, नावेरी या नद्यांना महापूर आला आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावरील वाहतूक दुपारी पावणे तीन वाजता पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नदीचे पाणी ओसरल्यावर साडेतीन तासानंतर सायंकाळी ६.२५ मिनिटांनी मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.

दरम्यान महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर घटनास्थळी भेट देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली. यांनतर सायंकाळी पुराच्या पाण्याची धोका पातळी कमी झाल्यानंतर ६.२५ वाजता पुलावरून महामार्गाची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी आंजणारी पुलाच्या कठड्याला लागले. या पुलाची इशारा पातळी १६.५० मीटर असून धोका पातळी १८.५० मीटर आहे. तर सध्याची पातळी १८.३१ मीटर इतकी आहे. यामुळे धोका पातळी गाठल्याने या पुलावरील वाहतूक दुपारी २.४५ वाजता बंद करण्यात आली आहे होती. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी लांजा पोलिस ठाण्याकडून पोलिस तैनात करण्यात आले होते.

काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी आंजणारी मठ येथील स्वयंभु श्री दत्त मंदिरात घुसले. हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मंदिराचा गाभारा व संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले असून या मंदिराचा केवळ कलश दिसत होता.

पुरामुळे तालुक्यातील पन्हळे – आनंदगाव – पडवण तसेच इंदवटी सुतारवाडी येथील रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आले होते. तसेच नावेरी नदीला आलेल्या पुराचे पाणी रिंगणे – झर्ये मार्गावरील रिंगणे गांगोवाडी येथे रस्त्यावर होते. तर मुचकूंदी नदीला आलेल्या पुरामुळे साटवली भंडारवाडी येथील लोकांच्या घरे तसेच भातशेतीमध्ये घुसल्याने घरे व भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

एकूणच पावसामुळे संपूर्ण लांजा तालुक्यात दाणादाण उडाली आहे. याबरोबरच पन्हळे – आनंदगाव – पडवण तसेच इंदवटी सुतारवाडी येथील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने याठिकाणचे रस्ते हे वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आले होते झाले आहेत नावेरी नदीला आल्या. तसेच रिंगणे – झर्ये मार्गावरील रिंगणे गांगोवाडी याठिकाणी नावेरी नदीचे पाणी रस्त्यावर आले होते. तसेच लांजा शहरातील एस.टी. बस डेपोजवळील पऱ्याला आलेल्या पुराचे पाणी महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर मुचकूंदी नदीला आलेल्या पुरामुळे साटवली भंडारवाडी येथील लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.

हेही वाचा;

Back to top button