पिंपरी : शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय..! | पुढारी

पिंपरी : शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय..!

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अद्याप तरी पिंपरी चिंचवड शहरात म्हणावा तसा मोठा पाऊस झालेला नाही. सध्या सुरू असलेल्या रिपरिप पावसानेदेखील रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये डबकी साचू लागली आहेत. महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील शाळेच्या मैदानातदेखील असेच पाणी साचल्यामुळे सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय, या गाण्याची आठवण करून देत आहे.

चिंचवड स्टेशन येथील महापालिका शाळेच्या मैदानावर पाण्याचे तळे साचले आहे. पाऊस असल्यामुळे सध्या मैदानाचा खेळासाठी वापर होत नसला तरी प्रवेशव्दारातून वर्गात ये- जा करण्यासाठी मुलांना पाण्यातून जावे लागत आहे. मैदानावर खड्डे पडले असल्याने पाणी साचत आहे. शाळेच्या मैदानांची डागडुजी करणे गरजेचे आहे. साचलेल्या पाण्यामुळे कीटकजन्य आजार पसरतात. त्यामुळे शाळा परिसरात पाणी साचणार्‍या भागांची डागडुजी करायला हवी.

हेही वाचा

अहमदनगर : मुळा धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठ्याची नोंद

सहकार कायद्यातील सुधारणांचे स्वागत ; आंतरराज्यीय सहकार विधेयकाबाबत विद्याधर अनास्कर यांचे मत

खतांचे लिंकिंग करणार्‍या कंपन्यांच्या मालकांवरही दाखल होणार गुन्हा; धनंजय मुंडे यांची घोषणा

Back to top button