राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार; ‘या’ भागांत ३ दिवस ऑरेंज अलर्ट | पुढारी

राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार; 'या' भागांत ३ दिवस ऑरेंज अलर्ट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग वाढला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनचा ट्रफ अद्यापही राजस्थानात असल्याने उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.

महाराष्ट्रातही कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चांगला पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात काही भागांत चांगला, तर काही भागांत कमी पाऊस आहे. 24 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने 25 ते 27 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

24 तासांत राज्यातील पाऊस..

कोकण : माथेरान 157, दोडामार्ग 145, पेण 140, रोहा 130, वैभववाडी 119, पेडणे 116, तळा 111, अंबरनाथ, राजापूर 110, उल्हासनगर 106, मुरबाड 104, पनवेल 103, चिपळूण 102, म्हापसा 101, मालवण, सुधागडपाली 92, कर्जत, लांजा 91, पोलादपूर 89, कणकवली 88, मुल्दे 85, दाबोलीम, सांगे 81, कुडाळ 79, देवगड 78, मुरूड 77, महाड, मंडणगड 76, माणगाव 75, अतलबाग, कल्याण 73, मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 210, महाबळेश्वर 164, लोणावळा (कृषी) 143, राधानगरी 110, आजरा 98, चांदगड 95, शाहूवाडी 94, यावल 73, इगतपुरी 60, मराठवाडा: माहूर 63, हिमायतनगर 35, किनवट 34, विदर्भ: अकोला 108, दिग्रस 100, बाळापूर 81, बार्शी टाकळी 80, महागाव , अकोले 77, जळगाव जामोद 76, संग्रामपूर 72, मानोरा 65, पुसद 57, मालेगाव 45, दारव्हा, नेर, मंगळूरपीर 41.

हेही वाचा

पुण्यात दिवसभर रिमझिम, रात्री संततधार

दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : ना. दादा भुसे यांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

कोंढवळ परिसरात पर्यटकांची गर्दी; पावसामुळे धबधब्यांचे आकर्षण

Back to top button