कोंढवळ परिसरात पर्यटकांची गर्दी; पावसामुळे धबधब्यांचे आकर्षण | पुढारी

कोंढवळ परिसरात पर्यटकांची गर्दी; पावसामुळे धबधब्यांचे आकर्षण

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे भीमाशंकर अभयारण्याच्या निसर्गसौंदर्यात भर पडली आहे. यातच कोंढवळ परिसरात असलेले धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करू लागले आहेत. भीमाशंकर परिसर घनदाट जंगलाने नटलेला आहे. सध्या हा परिसर पर्यटकांना मोहून टाकत आहे. भीमाशंकर जंगलात अनेक छोटे-मोठे धबधबे आहेत.

यातील सर्वांत मोठा धबधबा हा श्री क्षेत्र भीमाशंकरपासून सात किलोमीटरवर असलेल्या कोंढवळ परिसरात आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे वरच्या मुखपासून ते खालच्या खोल दरीपर्यंत सुमारे 100 फूट उंच धबधब्याचे पाणी तीन टप्प्यांत पडते. या ठिकाणी सतत पडणार्‍या पाण्यामुळे कुंडे तयार झाली आहेत. बि—टिश राजवटीच्या काळात – त्यांनी तयार केलेल्या टापो शिट नकाशावर या धबधब्याची नोंद आहे.

हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या परिसरात सध्या मोठ्या संख्येने येत आहेत. पावसाळ्यात कोंढवळचा परिसर हा
निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. कोंढवळ धबधबा पाहण्यासाठी पॅगोडा तयार करण्यात आला आहे. याबरोबरच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये हिरवेगार डोंगर, त्यातून पडणारे पांढरेशुभ— निखळ पाणी, धुक्याने वेढलेला परिसर, ढगांचा लपंडाव,
सतत कोसळणार्‍या पावसाच्या सरी अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले भीमाशंकर अभयारण्याकडे वळतात.

हेही वाचा

ठिबक सिंचनकडे 2 हजार शेतकर्‍यांची पाठ!

कोल्हापूर : अन्नातून विषबाधा; तीन कुटुंबांतील 9 अत्यवस्थ

मालवाहतूक एसटीचा कुरकुंभ घाटात अपघात

Back to top button