नांदेड : धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावात शिरले पुराचे पाणी | पुढारी

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावात शिरले पुराचे पाणी

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे धर्माबाद तालुक्यातील बजाळी गावातील शेकडो कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. तीस वर्षांपासून या गावाला पुराचा फटका बसत असतानाही गावाचे पुर्नवसन किंवा स्थलांतर करण्यासाठी हालचाली केल्या जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिक दर पावसाळ्यात स्वतःचा जीव मुठीत धरून जीवन जगत असतात. याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला आहे.

तालुक्यात सतत चार दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांना धर्माबाद येथे स्थलांतरित केले आहे. तर, अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन मात्र वेवळ वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झाली की, बन्नाळी गावात अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरते. दरवर्षी प्रशासन दोनशे अडीचशे नागरिकांचे धर्माबाद येथे स्थलातर करते. हा प्रकार तीस वर्षांपासून चालत आहे. पण प्रशासन दरवर्षी पुर आला की नागरीकांना स्थंलातर करते व पुर संपला की परत बन्नाळी गावात नागरीकांना पाठवितात हे नित्याचे झाले आहे.

यावर शासन दुर्लक्ष करीत असून एकच वेळेस शेवटचा निर्णय घ्यावा अशी संतापजनक बन्नाळी गावातील नागरिक करत आहेत. तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले, तलाव, ओहोळ तुडुंब भरले आहेत. पावसाने नागरिकांचे काही ठिकाणी जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. शेतात करण्यात आलेल्या खरीप पिकांची पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके खरडून गेली आहेत. तालुक्यातील चाळी गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

तीस वर्षापासून बन्नाळीकरांना पुराचा फटका

धर्माबाद तालुक्यातील गावात गेल्या तीन वर्षापासून पावसाळ्यात पुराच्या पाण्याचे थैमान सुरू असते. दरवर्षीच्या पावसाळ्यात या गावाला पुरावा वेडा पडतो. गावात अनेकांच्या घरात पाणी शिरते. नागरिकांना दरवर्षी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. असे असतानाही या गावाला पूरग्रस्त गावाचा दर्जा देऊन त्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी मात्र प्रशासकीय स्तरावर कोणत्याही हालचांली होत नाहीत. त्यामुळे बन्नाळीकरांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा;

Back to top button