Ishita Dutta : इशिता दत्ताच्या घरी बाळाचे आगमन, मुलाला दिला जन्म | पुढारी

Ishita Dutta : इशिता दत्ताच्या घरी बाळाचे आगमन, मुलाला दिला जन्म

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठच्या घरी बाळाचे आगमन जाले आहे. इशिताने मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही कलाकारांनी याविषयी कोणतीही पोस्ट अथवा माहिती दिलेली नाही. (Ishita Dutta ) मीडिया रिपोर्ट्सनुसीर, इशिताला शुक्रवारी, डिस्चार्ज मिळणार आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बाळ आणि आई दोघेही एकदम ठिक आहेत. (Ishita Dutta )

काही दिवसांपूर्वी इशिताने बेबी बंपसोबत फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, ओके, प्रेग्नेंसीचा अखेरचा महिना सोपा असत नाही.
सोबतच इशिताच्या आईने तिच्यासाठी ट्रॅडिशनल बेबी शॉवर आयोजित केलं होतं. इशिताने पिंक बनारसी आऊटफिट परिधान केलं होतं. यावेळी इशिताने लिहिलं होतं, ‘ओटीभरणी सेरेमनी. सेरेमनीचे काही सुंदर क्षण. तुमचं प्रेम आणि आशीर्वादासाठी थँक्यू’

काही काळ डेटिंग केल्यानंतर इशिता-वत्सलने २८ नोव्हेंबर, २०१७ रोजी लग्न केलं होतं. याचवर्षी ३१ मार्च रोजी दोघांनी इशिताच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

इशिता २०२२ मध्ये दृश्यम २ चित्रपटामध्ये दिसली होती. तिने अजय देवगनच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर प्रेग्नेंसीमध्येही इशिता काम करत होती. तर वत्सलने नुकताच गुजराती चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. तो गुजराती चित्रपटातून डेब्यू करत आहे.

Back to top button