तुला शिकवीन चांगलाच धडा : जगायला अक्कल लागते की शिक्षण लागतं! काय म्हणतेय विरीशा नाईक | पुढारी

तुला शिकवीन चांगलाच धडा : जगायला अक्कल लागते की शिक्षण लागतं! काय म्हणतेय विरीशा नाईक

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात हि मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. या निमित्ताने विरीशा नाईक काय म्हणते पाहुया.

विरीशा नाईक
विरीशा नाईक

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेबद्दल बोलताना विरीशा नाईक म्हणे, तसं पाहायला गेला तर ही मालिका आपल्याला माणूस म्हणून आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते. अक्कल वरचढ की शिक्षण वरचढ हे जे वादविवाद या मालिकेत आहेत तेच बघायला खूप गंमतीशीर आहे. भुवनेश्वरीचं असं म्हणणं आहे की जगायला किंवा पैसे कामवायला शिक्षण नाही तर अक्कल लागते. पण मला असं वाटतं की अक्कल आणि शिक्षण या दोन्ही गोष्ट समांतर असून ह्या मालिकेमध्ये ती गंमत आहे की नक्की कोण वरचं आहे.

आपल्या भूमिकेबद्दल ती म्हणते, मी चंचलाची भूमिका साकारत आहे. माझ्या या पात्राला अनेक छटा आहेत. ती खूप हुशार आहे, तिला कधी कसे वागायचे हे माहित आहे. त्यामुळे चंचला आणि तिची आई दुर्गेश्वरी त्या खूप लोभी आहेत. त्यांना फक्त पैसा हवा आहे. चंचलाला तिच्या मावशी सारखा म्हणजे भुनेश्वरी सारखा मान प्रतिष्ठा पद मिळवायचे आहे.

विरीशा नाईक
विरीशा नाईक

सहकलाकारां विषयी बोलताना नाईक म्हणते, या मालिकेची पूर्ण टीम खूप कमाल आहे. माझे बहुतेक सीन्स भुवनेश्वरीची भूमिका करणाऱ्या कविता ताई, माझी आई दुर्गेश्वरीची भूमिका करणाऱ्या दीप्ती ताई आणि आदिपतीची भूमिका करणाऱ्या ऋषी यांच्यासोबत असतात आणि मला या लोकांकडून खूप काही शिकायला मिळतंय.

विरीशाची पहिली भूमिका झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत होती. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही माझी दुसरी मालिका आहे. या संधीबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे.

Back to top button