आता OTT वर शिव्या, अश्लिल कंटेंट चालणार नाही! काय म्हणाले अनुराग ठाकुर? | पुढारी

आता OTT वर शिव्या, अश्लिल कंटेंट चालणार नाही! काय म्हणाले अनुराग ठाकुर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : माहिती व प्रसारण मंत्री अनुराग यांनी ओटीटी कंटेंटबद्दल मोठी माहिती दिलीय. थिएटर आणि टीव्ही व्यतिरिक्त, लोक आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब मालिका पाहण्यास प्राधान्य देतात. सरकार याबाबत मोठे पाऊल उचलणार आहे. (OTT) मंगळवारी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला. (OTT)

ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या असभ्य आणि अपमानास्पद मजकुराला आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटीने सर्व वयोगटातील लोक ते पाहत आहेत याची काळजी घेतली पाहिजे. ओटीटी ब्रॉडकास्टर्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करू नका, असे सांगण्यात आले.


भारतीय संस्कृतीचा अपमान करू देणार नाही

अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकार रचनात्मक स्वातंत्र्य नावाने भारतीय संस्कृती आणि समाजाला अपमानित करण्याची परवानगी देत नाही. कंटेंटच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अपमान करू दिला जाणार नाही.

ट्विटरवरून दिली माहिती

बैठकीनंतर अनुराग ठाकुर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Back to top button