kolhapur rains : तेरवाड, शिरोळ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली | पुढारी

kolhapur rains : तेरवाड, शिरोळ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा पंचगंगा नदीची पाणी पातळी १६ फूट ६ इंच झाली आहे, तर कृष्णा नदीची पाणीपातळी १४ फूट इतकी झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यातील तेरवाड व शिरोळ दोन्ही बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. राजापूर बंधार्‍यातून कर्नाटकला १४ हजार, ४७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तेरवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. तेरवाड बंधाऱ्याची पाणी पातळी ४० फूट झाली आहे. तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंत सध्या जलपर्णीचे जाळे निर्माण झाले असून, ती तुंबून राहिली आहे. शिरढोण पुलावरून पाणी वाहते झाल्याशिवाय जलपर्णीचा विळखा सुटणे कठीण आहे. शिरोळ बंधाऱ्याची पाणी पातळी ३१ फूट ९ इंच झाली आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

हेही वाचा : 

Back to top button