रायगड : खालापुरात झेनिथ, आडोशी धबधब्यावरही पर्यटकांना येणास मज्जाव | पुढारी

रायगड : खालापुरात झेनिथ, आडोशी धबधब्यावरही पर्यटकांना येणास मज्जाव

खोपोली, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर पर्यटकांना येण्यास बंदी असतानाच गटारी शनिवार, रविवार लागून आल्याने पर्यटक आनंद करण्यासाठी आले होते. दरम्यान, धबधब्यावर आपातकालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी शनिवारी तहसिलदार आयुब तांबोळी आणि खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी पाहणी करीत प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी करू नये, असे अवाहन केले. तसेच यासाठी सतर्क रहा असा इशारा पालिकेच्या आपातकालीन टीमला दिला आहे.

झेनिथ धबधबा पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संबंधी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत,रायगड यांनी फौजदारी आचार संहिता कलम १४४ जारी केले. पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात आनंद साजरा करण्यासाठी येत आहेत. शनिवार, रविवारलाच लागून गटारी आल्याने धबधब्यावर फिरण्यासाठी, मुंबई, डोंबिवली,कल्याण उपनगरातील पर्यटक येत आहेत. झेनिथ धबधबा पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असतानाही हजारो पर्यटक सर्व यंत्रणेला शह देत धबधब्यावर येत आहेत.

ही गंभीर बाब लक्षात घेत तहसिलदार आयुब तांबोली आणि खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे,खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक घरबुडे, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे गुरूनाथ साठेलकर, नगरपालिकेचे आपतकालीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सर्प मित्र उपस्थित होते. यावेळी तहसिलदार आयुब तांबोली आणि खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी पर्यटकांमध्ये जनजागृती करीत धबधब्यावर येण्यास मज्जाव केला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button