PM Modi UAE Visit : UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद यांच्या PM मोदींसाठीच्या मेजवानीत संपूर्ण शाकाहारी जेवण!

PM Modi UAE Visit
PM Modi UAE Visit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क :PM Modi UAE Visit : UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीत संपूर्ण शाकाहारी जेवण दिले. UAE अध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या अबुधाबी दौऱ्यावर आहेत.

येथील कसर-अल-वतन अध्यक्षीय राजवाड्यातील मेजवानीची सुरुवात हरीस (गहू) आणि खजुरांच्या सॅलडने स्थानिक सेंद्रिय भाज्यांसोबत केली गेली आणि त्यानंतर मसाला सॉसमध्ये ग्रील्ड भाज्या स्टार्टर म्हणून दिली गेली. PM Modi UAE Visit

मान्यवरांना मुख्य कोर्ससाठी फुलकोबी आणि गाजर तंदुरीसह काळी मसूर आणि स्थानिक हरे (गहू) देण्यात आले. मिठाईसाठी स्थानिक हंगामी फळांची निवड केली गेली.

"सर्व जेवण शाकाहारी आहेत आणि वनस्पती तेलाने तयार केलेले आहेत, आणि त्यात कोणतेही दुग्धजन्य पदार्थ किंवा अंड्याचे पदार्थ नाहीत," अशी नोट मेजवानीच्या मेनू कार्डवर होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news