सर्वच ऋतूंमध्ये प्या नारळपाणी, ‘या’ समस्यांपासून मिळतो आराम | पुढारी

सर्वच ऋतूंमध्ये प्या नारळपाणी, 'या' समस्यांपासून मिळतो आराम

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच नव्हे तर सर्वच ऋतूंमध्ये नारळपाणी उपयुक्त ठरत असते. याचे कारण म्हणजे नारळपाण्यात अनेक पौष्टिक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, क्लोराईड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. साखर, सोडियम, प्रथिनेही मर्यादित प्रमाणात असतात. नारळाचे पाणी डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते. घामाने शरीरातून गमावलेले नैसर्गिक क्षार भरूनही ते थकवा दूर करते. नारळपाणी हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत असते. हे आहारातील मँगेनिज, कॅल्शियम, फायबर आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.

नारळ पाणी त्वचेला टॅनिंग आणि सन बर्नपासून वाचविण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात भरपूर पोटॅशियम असते, जे त्वचेला पोषक आणि ऑक्सिजन देते. नारळाचे पाणी त्वचेला ‘मॉइश्चरायझ’ करते. यासोबतच चेहर्‍यावरील काळे डागही दूर होतात. मुरुमांच्या समस्येवर नारळपाणी खूप उपयुक्त ठरते. नारळाचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, मळमळ आणि पित्त यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Back to top button