Anibani Movie : अभिनेता प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज | पुढारी

Anibani Movie : अभिनेता प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज

पुढारी ऑनलाईन : वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यांची स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ ( Anibani Movie ) या मराठी चित्रपटात त्यांचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने केलं आहे.

प्रत्येक गावात एक अवलिया असतो. गावातल्या अनेक छोटया- मोठया गोष्टींची बित्तंमबातमी त्याच्याकडे असते. अनेकदा गावात घडणाऱ्या चांगल्या, वाईट घडामोडींनाही तोच जबाबदार असतो. सगळ्यांशी जवळीक असलेल्या पैलवान केशवची मजेशीर व्यक्त्तिरेखा प्रवीण तरडे साकारली आहेत. पहाता क्षणी हसू येईल अशी केशभूषा आणि वेशभूषा तरडेंनी ( Anibani Movie ) चित्रपटात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्याची मिश्किल छबी आपल्याला पहायला मिळत आहे.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

हेही वाचा : 

Back to top button