पुणे : खासगी बसचालकाचा परवाना जागेवरच रद्द | पुढारी

पुणे : खासगी बसचालकाचा परवाना जागेवरच रद्द

पुणे : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागामार्फत खासगी बस तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत दारू पिऊन गाडी चालविणारा चालक आढळल्यास त्याचा परवाना जागेवरच रद्द करण्यात येणार असून, त्याला देशात कुठेही नवीन परवाना काढता येणार नाही.

भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी बसमालकांची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. याप्रसंगी पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ही माहिती दिली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, बस अँड कार ओनर्स असोशिएसनचे अध्यक्ष राजन जुनवणे, बाळासाहेब खेडेकर, बस अँड कार ओनर्स असोशिएसनचे कार्याध्यक्ष किरण देसाई व राज्यातील विविध भागांतून आलेले खासगी बसमालक, संचालक उपस्थित होते.

याची होणार तपासणी…

  • आपत्कालीन दरवाजा स्थिती
  • ड्रंक अँड ड्राईव्ह, स्पीड गव्हर्नर
  • अग्निशमन यंत्रणा, लाईट्स, इंडीकेटर
  • बसमधील प्रवासी क्षमता
  • वाहनचालकांची मेडिकल टेस्ट
  • बसची फिटनेस तपासणी केली की नाही
  • मालवाहतूक न करणे

आपण आपल्या बसमार्फत समाजाची सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जपणे कर्तव्य आहे. त्यामुळे बस सुस्थितीत असाव्यात आणि चालकाची वारंवार तपासणी करायला हवी. त्याकरिता मी दहा कलमी कार्यक्रम तयार केला असून, त्याचे नियमित पालन होते.

– प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, खासगी बस वाहतूक संघटना.

हेही वाचा

एक टि्वट अन् नराधम गजाआड; पोलिसांच्या सोशल मीडियावरील तक्रारीची दखल

पंढरपूर : पत्रा उडाल्यानेे चिरला मोटारसायकलस्वाराचा गळा

पश्चिम विभागाचा डाव गडगडला; पृथ्वीची एकाकी झुंज

Back to top button