Money Laundering Case | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारला | पुढारी

Money Laundering Case | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारला

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अद्याप न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांचा आता जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. (Money Laundering Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात २३ फेब्रुवारी २०२२ पासून मलिक अटकेत आहेत.

दरम्यान, आरोग्याच्या कारणास्‍तव मलिकांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीला ६ जुनपर्यंत स्थगिती दिली होती. मलिकांनी त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणी घेत उच्च न्यायालयाला बगल देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मलिकांच्या याचिकेला स्थगिती दिली होता. यादरम्यान उच्च न्यायालय हे प्रकरण हाताळण्यास स्वतंत्र असेल, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते.

हे ही वाचा :

Back to top button