Nawab Malik Son Visa Case : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलावर बनावट कागदप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

Nawab Malik Son Visa Case : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलावर बनावट कागदप्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन: राज्‍याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरूद्ध बनावट कागदप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

फराज मलिक याच्याविरूद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराज याने २०२० मध्‍ये फ्रान्सच्या एका महिलेला तिच्या व्हिसाची मुदत वाढवून देण्यास मदत केली होती. संबंधित प्रकरणाच्या चौकशीनंतर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत दिली माहिती

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही याप्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिच्यासाठी ही बनावट कागदपत्रे बनवली ती फरास मलिक यांची दुसरी पत्नी हॅमलिन आहे, जी फ्रेंचची रहिवाशी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ‘दुसरो का फ़र्ज़ीवाड़ा बताने वाले , ख़ुद कितने फ़र्ज़ी हैं !’ असेही मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी ईडीकडूनही बजावला होता समन्स

माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज याला सक्‍तवसुली संचालनालयाने( ईडी ) चौकशीचे समन्स पाठवले होते.  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्‍यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले होते.

हेही वाचा:

Back to top button