Hachiko story : ‘या’ श्वानाचे त्याच्या मालकावरील प्रेम पाहून तुमचेही मन गहिवरेल | पुढारी

Hachiko story : 'या' श्वानाचे त्याच्या मालकावरील प्रेम पाहून तुमचेही मन गहिवरेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हाचिको’ नुकताच ५ जुलै रोजी १०० वर्षांचा झाला. कोण आहे हा ‘हाचिको’ असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? हाचिको ही कोणी व्यक्ती नाही तर एक श्वान आहे. तर त्याची चर्चा सोशल मीडियासह जगभरात होत आहे. तर एका श्वानाच्या १०० व्या वर्षाचा आणि चर्चेचा संबंध काय? असही तुम्हाला वाटू शकते. पण ‘हाचिको’ची चर्चा होतेय ती त्याच्या मालकाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम याची. तो तब्बल १० वर्षे आपल्या मृत पावलेल्या मालकाची वाट पाहत होता. जाणून घेऊया ‘हाचिको’ची गोष्ट (Hachiko story)

श्वान आणि माणूस यांच्यातील प्रेम कोणापासून लपलेले नाही. हचिकोची कथाही हृदयस्पर्शी आहे. ‘हाचिको’ तो जगातील सर्वात निष्ठावान कुत्रा मानला जातो. हाचिकोचे मालक टोकियो विद्यापीठात प्राध्यापक होते. दोघांमधलं नातं इतकं सुंदर आणि गहिरं होतं की हाचिको रोज स्टेशनवर आपल्या मालकाला घ्यायला पायी जायचा.

Hachiko story : १० वर्षे वाट पाहिली

हाचिकोचे मालक म्हणजे आयझाबुरो यूएनो यांनी बराच शोध घेतल्यानंतर हचिकोला दत्तक घेतले होते. दोघांची जवळीक वाढत गेली. हाचिको रोज स्टेशनवर त्याच्या मालकाला सोडायला जायचा आणि त्याला घ्यायलाही जायचा. २१ मे १९२५ रोजी हाचिको नेहमीप्रमाणे आयझाबुरो यूएनो यांना घेण्यासाठी गेला, परंतु  त्या दिवशी ते त्याला भेटलेच नाही. खरतर अझाबुरो सेरेब्रल हॅमरेजने त्रस्त होते, त्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला. पण हाचिकोने शिबुया स्टेशनवर जाणे सोडले नाही. तो रोज सकाळ संध्याकाळ स्टेशनवर सतत जात असे. हाचिकोचा १० वर्षे हा नित्यक्रम होता. त्याच्या या कृतीमुळे त्याला जगातील निष्ठावान श्वान मानले जाते.

हाचिकोचा पुतळा

१९४८ साली  टोकियोच्या शिबुया स्टेशनच्या बाहेर हाचिकोचा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा त्याच्या मालकावरील निष्ठा आणि प्रेमाच्या प्रित्यार्थ बांधण्यात आला आहे.  हाचिको या वर्षी १०० वर्षांचा झाला आणि अजूनही त्याच्या निष्ठेसाठी लक्षात ठेवला जातो. हाचिकोवर एक चित्रपटही बनवला गेला आहे, ज्यामध्ये त्याची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट खूप भावनिक आहे.

हेही वाचा 

Back to top button