दोन श्वानांना सांभाळण्याचा पगार 2 कोटी!

दोन श्वानांना सांभाळण्याचा पगार 2 कोटी!
Published on
Updated on

लंडन : आपण जगभरातील अनेक नोकर्‍यांबाबत ऐकलेले किंवा वाचलेले असते. यातील काही नोकर्‍या किती धोकादायक असतात की, ऐकूनच त्याची धास्ती वाटावी. काही नोकर्‍यांमध्ये मात्र असा पगार ऑफर केला जातो की, लोक अगदी धोके काय आहेत, याचाही विचार करणार नाहीत. आता सोशल मीडियावर अशीच एक नोकरी ऑफर केली जात आहे, ज्यात 2 श्वानांना सांभाळण्यासाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क 1 कोटी रुपये पगार दिला जाणार आहे.

लाईटहाऊसमध्ये बल्ब बदलण्याची नोकरी, ट्रक ड्रायव्हिंगची नोकरी, खाणीत काम करण्याची नोकरी नेहमीच धोकादायक असतात; पण त्याचे उत्तम पैसेही मिळतात. आता कुत्रे सांभाळण्यात इतका धोका नसेलही. एका अब्जाधीशाने मात्र आपल्या घरी राहून 2 कुत्रे सांभाळण्याची जाहिरात दिली असून याचा पगार 1 कोटी रुपये इतका असेल, असे जगजाहीर केले आहे.

सदर अब्जाधीश लंडनमधील नाईटस्बि—ज येथे स्थित असून घरातील दोन श्वानांना सांभाळण्यासाठी पूर्ण वेळ व्यक्तीची त्यांना आवश्यकता आहे. त्यांना वेळेवर खाण्या-पिण्यास देणे, त्यांच्या सर्व गरजा पाहून घेणे व आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडे घेऊन जाणे, इतकी जबाबदारी असणार आहे.

श्वानांच्या आहाराची कल्पना असणे व त्यांच्यासमवेत हितगुज करता यावे, या दोन अपेक्षा असून जॉर्ज रॅल्फ डन ऑफ फेयरफॅक्स अँड केनिंग्स्टन या एजन्सीने ही जाहिरात दिली आहे. या नोकरीसाठी प्रतिवर्ष 1 कोटी रुपये वेतन दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अशा असतील सुविधा

ही नोकरी करणारा उमेदवार हाय प्रोफाईल ठिकाणी राहील आणि त्याची उठबस देखील अशाच महनीय व्यक्तींमध्ये असेल. त्याचप्रमाणे दरवर्षी 6 आठवडे अर्थात 42 दिवसांची सुट्टी असेल. श्वानांबरोबरच सदर नोकराला प्रायव्हेट जेटमध्ये लक्झरी प्रवासाची संधी मिळेल, त्याचप्रमाणे आहाराची व निवासाचीही व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, या बदल्यात दोन्ही श्वान हेच प्राधान्यक्रम असावेत आणि एका कॉलवर सारे काही सोडून तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा, अशी या अब्जाधीशाची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news