Heavy Rainfall in Mumbai: पुढील ४, ५ दिवस मुंबईत अतिमुसळधार; BMC चे अधिकाऱ्यांना निर्देश | पुढारी

Heavy Rainfall in Mumbai: पुढील ४, ५ दिवस मुंबईत अतिमुसळधार; BMC चे अधिकाऱ्यांना निर्देश

पुढारी ऑनलाईन: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान येत्या ४, ५ दिवसात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. यामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचून पूर येण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे महानगरपालिकेने मुंबई क्षेत्रातील अधिकाऱ्यांना निर्देश (Heavy Rainfall in Mumbai) दिले आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील ४-५ दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साठून पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सखल भागांना भेटी द्याव्यात. तसेच तातडीने आवश्यक ती कारवाई करत उपाययोजना कराव्यात अशा सूचनांचे निर्देश मुंबई मनपाकडून (Heavy Rainfall in Mumbai) देण्यात आल्या आहेत.

आगामी पाच दिवस असा पडेल पाऊस
कोकण : 28 जून ते 2 जुलै : अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट). पुणे, सातारा, नाशिक घाट : 28 ते 30 जून (ऑरेंज अलर्ट). मध्य महाराष्ट्र : 27 ते 30 जून : (संततधार ). मराठवाडा : 27 ते 30 जून : (संततधार). विदर्भ : 28 जून : (ऑरेंज अलर्ट), पुढे 2 जुलैपर्यंत (मुसळधार).

हेही वाचा:

Back to top button