उद्धव ठाकरे हताश झाल्याने अशी वक्तव्ये : प्रवीण दरेकर | पुढारी

उद्धव ठाकरे हताश झाल्याने अशी वक्तव्ये : प्रवीण दरेकर

पुणे : भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे हे हताश झालेले असून, आक्रस्ताळेपणा करताना दिसतात. ते हतबल झालेले असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल बोलत आहेत, अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दै. ’पुढारी’ आयोजित सहकार परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरेकर म्हणाले की, कोविडमध्ये उत्तम सीएम म्हणजे उत्तम चोर माणूसे, असे कोणी म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. उध्दव ठाकरे यांनी आपली ताकद काय आहे, हे मागे वळून पाहावे.

स्वतः मुख्यमंत्री असताना साधा पेनही धरू शकलेले नाहीत. विकासाबद्दल काहीही न बोलता केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही कृती सुरू आहे. त्यांनी स्वतःला प्रथम आरशात पाहावे. अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबालाही भेटायला गेलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरू होत असल्याचे त्यांना पाहवत नाही. मोदी सरकारने नऊ वर्षांत काय केले, याचे एक पुस्तक त्यांना वाचण्यास पाठविणार आहे. ते वाचतील की नाही माहीत नाही; परंतु मोदी यांनी केलेल्या विकासाचे पुस्तक नक्की पाठविणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. भाजपमुक्त देशासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहेत. याअगोदर असे घडले होते. सगळे एकत्रितपणे आले होते. पण, काय झाले ते सर्वांनी पाहिल्याचे दरेकर यांनी सांगितले.

केसीआरला महाराष्ट्रात थारा नाही

महाराष्ट्रात कोणालाही येण्यास परवानगी आहे, तसा सगळ्यांना यायचा अधिकार आहे. सिद्रमया येऊ नाही, तर केसीआर येऊ, महाराष्ट्र आशा लोकांना थारा देणार नाही, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

पंकजाताईंची मोठी ताकद
पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकून केसीआरमध्ये जाणार याच्याबद्दल वावड्या उठविल्या जात आहेत. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्यांची ताकद आहे. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. ताकद असल्याशिवाय पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली नसती, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

पुढारी सहकार महापरिषद: पतसंस्थांच्या प्रश्नांवर 15 दिवसांत बैठक घेणार ; आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही 

सांगली : ‘ईडी’कडून दुसर्‍या दिवशीही छापेमारी

 

Back to top button