Maharashtra politics | ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत केसरकरांचा मोठा खुलासा | पुढारी

Maharashtra politics | ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत केसरकरांचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियाची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यावर शिंदे गटातील मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Kolhapur Guardian Minister Deepak Kesarkar) यांनी खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यावर राज्याच्या गृह विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी खोटे बोलू नये, असे केसरकर यांनी म्हटले आहे. (Maharashtra politics)

ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईडीचे छापे असोत अथवा सुरक्षेत कपात असो या सर्व गोष्टी राजकीय हेतूने चालल्या आहेत. पण त्यांना त्यांच्या कृतीचे फळ मिळेल. ते (भाजप) जास्तीत जास्त काय करू शकतात, ते आम्हाला गोळ्या घालू शकतात किंवा तुरुंगात टाकू शकतात, असे राऊत यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. तीस वर्षांनंतर प्रथमच मातोश्रीच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra politics)

हे ही वाचा :

Back to top button