कोल्हापूर : ‘भोगावती’साठी दुसर्‍या दिवशी ५३ उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

कोल्हापूर : ‘भोगावती’साठी दुसर्‍या दिवशी ५३ उमेदवारी अर्ज दाखल

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी राशिवडे बुद्रुक, कौलव, कुरुकली, सडोली खालसा, कसबा तारळे गटासह महिला गट व इतर मागास गटातून 53 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेव पाटील, विद्यमान संचालक कृष्णराव पाटील-राशिवडेकर यांनी अर्ज दाखल केले. दुबार उमेदवारी अर्जासह दोन दिवसांत 76 अर्ज दाखल झाले.

गट क्र. 1 कौलवमधून उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, सुशील पाटील, रावसो डोंगळे यांच्यासह आठ तर गट क्र. 2 राशिवडे बुद्रुकमधून विद्यमान संचालक कृष्णराव पाटील, संजयसिंह कलिकते यांच्यासह नऊ, गट क्र. 3 कसबा तारळेतून अभिजित पाटील, गट क्र. 4 कुरुकलीमधून माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेव पाटील यांच्यासह अकरा तर गट क्र. 5 सडोली खालसामधून माजी संचालक रघुनाथ जाधव, राजू आडके यांच्यासह पाच तर महिला गटातून वृषाली चौगले, मनीषा पाटील तर अनुसूचित गटातून विद्यमान संचालक जयवंत कांबळे, आण्णाप्पा कांबळेसह तीन तर इतर मागास गटातून नामदेव पाटील, तानाजी लाड यांनी अर्ज दाखल केले.

Back to top button