Kriti Sanon : क्रिती सेनॉनचे ट्रेनरने केले कौतुक | पुढारी

Kriti Sanon : क्रिती सेनॉनचे ट्रेनरने केले कौतुक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा ( Kriti Sanon ) मिमी चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात सर्व सीमा ओलांडून क्रितीने बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये प्रवेश केला आहे. क्रिती सध्या लंडनमध्ये तिच्या पुढील अॅक्शन थ्रिलर ‘गणपथ’ च्या शूटिंगमध्ये बिझी असून कुंग फू ट्रेनरने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नुकताच क्रितीच्या ( Kriti Sanon) ट्रेनर कुंग फूने अकादमीमध्ये तिचे स्वागत करताना स्वतःचा आणि क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ट्रेनरने क्रितीच्या अनेक सकारात्मक गोष्टीचे कौतुक केले आहे. यात तिची नम्रता, समर्पण, इच्छा आणि अशा इतर गुणांची प्रशंसा केली आहे.

या फोटोत क्रिती काळ्या- पांढऱ्या रंगाच्या डेनिममध्ये तर ट्रेनर कुंग फूने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅट घातली आहे. यावेळू दोघेही खूपच आनंदीत दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना कुंग फूने लिहिले आहे की, ‘योद्धा कृती माझ्या शाओलिन स्कूलमध्ये तुझे स्वागत आहे. तू अत्यंत मेहनती, नम्र, समर्पक आणि पटकन समजून घेणारी व्यक्ती आहेस. आणि एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे. तुझा प्रवास खरोखर अभिमानाचा आहे. तुझी प्रशिक्षित होण्याची, निरीक्षण करण्याची आणि शिकत राहण्याची जिद्द आम्हाला प्रेरणा देते.

याशिवाय मला तुझी विनोदबुद्धी देखील आवडते. माझ्यावर आणि माझ्या शाळेवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्व प्रकल्पांना आणि मुख्यत्वे # गणपथला माझ्याकडून शुभेच्छा. माझ्याकडे न्यायाम करण्यासाठी पुन्हा केव्हा येताय यांची मी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे.’ असे त्यांने म्हटले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात ‘उत्कृष्ट’, ‘सुरेख’ अशा कॉमेन्टससोबत प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.

याआधी क्रिती सेनॉनला लंडनमध्ये आगामी ‘गणपत’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. यापूर्वी क्रिती ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना ट्रेलरमधील क्रितीचा लूक आवडला असून ते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

याशिवाय क्रितीकडे आगामी ‘आदिपुरुष’, ‘भेडिया’, ‘बच्चन पांडे’, ‘गणपथ’, ‘शहजादा’ आणि ‘हम दो हमरे दो’ यासारखे चित्रपट आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button