Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा 'शहजादा' मधून धमाका | पुढारी

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा 'शहजादा' मधून धमाका

मुंबई; पुढारी ऑनलाईन: चित्रपट ‘धमाका’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनने ( Kartik Aaryan ) आता ‘शहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कार्तिक आर्यनने सध्या बॅक टू बॅक अनेक प्रोजेक्ट्सच्या घोषणा करत आहे.

नुकतेच कार्तिकने ( Kartik Aaryan ) आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिक एका बंगल्यामध्ये पाठमोरा उभारलेला दिसत आहे. तसेच त्याच्या हातात एक फलक असून त्यावर इंग्रजीमध्ये आगामी ‘Shehzada’ या चित्रपटाचे नाव लिहिले आहे. यावेळी कार्तिकने तपकिरी रंगाचा शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची पॅट घातली आहे.

याशिवाय कार्तिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये” #Shehzada 👑 shuru..” असे लिहिले आहे. यावरून कार्तिक आर्यन आता ‘शहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याचे समजते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या आहेत.

नुकताच कार्तिकचा आगामी ‘धमाका’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला होता. यानंतर आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची घोषणा केली आहे. यावरून कार्तिक न थांबता, अथकपणे चोवीस तास काम करताना दिसत आहे.

यात कार्तिक शूटिंग असो, प्रमोशन असो किंवा लॉन्च इवेंन्ट सर्व कार्यक्रमात हजेरी लावत आहे. कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट ‘शहजादा’ मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक रोहित धवनसोबत काम करत आहे. कार्तिककडे आगामी चित्रपटांची भली मोठी रांग असून ‘धमाका’, ‘भूल भुलैया २’, अलाया एफसोबत ‘फ्रेडी’ या चित्रपटाचा समावेश आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Back to top button