ओतूर : गांजा वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात ! तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

ओतूर : गांजा वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात ! तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नगर- कल्याण महामार्गावरून गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती ओतूर पोलिसांनी मिळाली. तात्काळ दक्ष पवित्रा घेत ओतूर हद्दीत कातकरी वस्तीनजीक सापळा रचून गांजा वाहतूक करणारी बोलेरो जीप आणि १२ किलो ४०० ग्रॅ. वजनाच्या गांजासह दोघांना अटक केली असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. सिद्धार्थ किशोर टेकड़े (वय ३१ ) रा. संगमनेर आणि संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७) रा. संगमनेर जि. अहमदनगर अशी दोन्ही आरोपींची ओळख आहे.

अधिक माहिती अशी की, हे दोघे बोलेरो जीप नं (एम एच १७ बी एस ०३३६) या गाडीतून नगर – कल्याण महामार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होते. सदर गाडीत १२ किलो ४०० ग्रॅ. वजनाचा गांजा आणि गाडी असा एकूण अंदाजे किंमत ६ लाख ६० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ओतूर पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार नरेंद्र गोराने, महेश पटारे, पोलीस नाईक देविदास खेडकर,धनंजय पालवे यांनी केली आहे.

हेही वाचा

राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच आता संचमान्यता!

पुणे : लाचखोरीमुळे अटक झालेला रामोड हा पहिला आयएएस

पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचे पालखीमुळे फेरनियोजन

Back to top button